मंडणगड | प्रतिनिधी: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे आज दिनांक 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. संजय अवेरे यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात योगाचे महत्त्व ,याविषयी माहिती सांगून ,श्री .संजयअवेरे व श्री. मनोज चव्हाण यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवले व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला.
यामध्ये अनुलोम, विलोम, कपालभाती हे प्राणायाम ,वृक्षासन, हस्त पादासन ,त्रिकोणासन, ओमकार या योगासनांचा समावेश होता.
यामध्ये
विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
यानिमित्ताने प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हूल्लोळी ,पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर ,क्रीडा शिक्षक श्री. संजय अवेरे,श्री. मनोज चव्हाण, सौ. ज्योती राणे, श्री. शैलेश खताते ,सौ. शकुंतला वाघमारे, त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अशाप्रकारे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.











