४९ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात घेतला सहभाग
वेंगुर्ले | दाजी नाईक :आयुष चॅलेंजर परबवाडा मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्या वतीने आणि जी एम सी बांबोळी ब्लड बैंक, बांबोळी गोवा यांच्या सहकार्याने जि. प. पूर्ण प्राथ. शाळा परबवाडा नं. १ येथे ४ थे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ४९ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
परबवाडा येथील या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संदीप परब, नाना राऊळ, सुनिल परब, ऑन कॉल रक्त दाते बाबली गवंडे, राजेश पेडणेकर, मणी रेवणकर, दाजी गवंडे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंगेश गवंडे, किशोर कांबळी, विश्वास पवार, अरुण पेडणेकर, जयेश परब, शुभम नाईक, हर्षल नाईक, हर्षल परब, सहदेव परब, आबा चीपकर, श्रीकृष्ण कोंडस्कर, भूषण मांजरेकर, राजन पडवळ, चिन्मय तेरेखोलकर, तन्मय तेरेखोलकर, रुपेश मळगावकर, आर्यन राऊळ, हर्ष राऊळ, छगन प्रजापत, परबवाडा शाळेचे मुख्याध्यापक झोरे सर, दादा पेडणेकर, प्रदीप परब, निलेश मांजरेकर, सचिन कोंड्ये, सागर येरम, राकेश नाईक, मंदार पडवळ, बंटी पिंगुळकर, पेरसन मेंडिस, चंद्रशेखर केरकर, नाना पवार, प्रतिक गवंडे, समिर चिंदरकर आदींसह ग्रामस्थ आणि जी. एम. सी. बांबुळी चे डॉकटर श्री. पास्कोल व त्यांची पूर्ण टीम यांचे सहकार्य लाभले.
रक्तदात्यांना मित्र मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सहकार्य करणारे जी. एम. सी. बांबुळी चे डॉकटर श्री. पास्कोल यांचाही मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.











