मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तळागाळात पोहचणार

 

युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुशील भायजे

माखजन |वार्ताहर : महाराष्ट्राच्या महायुतीसरकार ने राज्यातील माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे. ही योजना जनतेतील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष सुशील भायजे यांनी दिली.ह्या योजनेचा लाभ घेताना अनेक अशिक्षित महिलाना व कुटुंबाना अडचणी येत आहेत.या अडचणी दूर करून शासनाची कल्याणकारी योजना कशी सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल यासाठी मी स्वतः व अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्याची प्रतिक्रिया सुशील भायजे यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे.

 

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिला विविध निकषाच्या आधारे लाभार्थी असणार आहेत.
सध्या विविध शासकीय कार्यालयात योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ उडाली आहे.हिच धावपळ कमी व्हावी यासाठी आम्ही काम करणार आहोत असे सुशील भायजे यांनी सांगितले.