दोडामार्ग | सुहास देसाई ; कोलझर येथील साई कृपा दिव्यांग, निराधार, गरजू संघटनेच्यावतीने दिला जाणारा समाज गौरव पुरस्कार दै. पुढारीचे पत्रकार रत्नदीप गवस यांना जाहिर झाला आहे. इतर सहा जणांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी दिली.
साई कृपा दिव्यांग, निराधार, गरजू संघटनेच्या वतीने समाजातील गोरगरीबांसाठी विशेष प्रेरणादायी व उल्लेखनीय काम करणाऱ्या सप्त व्यक्तिमत्त्वांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार १४ जुलै रोजी सकाळी ११ वा. समाजसेवा हायस्कूल कोलझर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शिक्षण महर्षी अच्युत सावंत-भोसले, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, पत्रकार रत्नदीप गवस (दै. पुढारी), कोकणसाद लाईव्ह संपादक पत्रकार देवयानी वरसकर, कुंब्रल माजी सरपंच प्रवीण परब, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, गावठी वैद्य काशीनाथ शेटवे (कावीळ औषध) यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच सामाजिक सहकार्यातुन रुग्णसेवेसाठी खरेदी केलेल्या साहित्यांचे लोकार्पण होणार आहे.










