मुंबई गोवा हायवे वर खेरशेत येथे पाणी

माखजन |वार्ताहर

मुसळधार पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत व्हयला सुरवात झाली आहे.मुंबई गोवा महामार्गांवर ठीक ठिकाणी पाणी साचायला सुरवात झाली आहे.आरवली नजिक चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे मुंबई गोवा महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुचाकिसह, रिक्षा,आणी कार ना रस्ता पार करणे जिकिरीचे झाले आहे.पावसाचा जोर असाच कायम रहिल्यास मुंबई गोवा हायवे वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एवढ्याश्या पावसात मुंबई गोवा हायवेवर पाणी साचणे हे ठेकेदाराच्या कामातील दोष असल्याचे बोलले जात आहे.सध्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालवताना चालक कचरत आहेत.