तालुक्यातील पूर परिस्थिती पूर्व पदावर, नद्यांचे पूर ओसरले

 

 

महसूल प्रशासनामार्फत नुकसानीची आकडेवारी घेण्याचे काम वेगाने सुरू

लांजा( प्रतिनिधी) दोन दिवस तालुक्याला झोडपून काढल्या नंतर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर सोमवारी तालुक्यातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे तर आंजणारी मठ येथील दत्त मंदिरातील पाणी ओसरले आहे .दरम्यान तालुक्यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असून महसूल प्रशासनामार्फत नुकसानीची आकडेवारी घेण्याचे काम वेगाने सुरू आहे

शनिवारी व रविवारी पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.भांबेड येथील भाई जोशी यांच्या घर परिसरात रविवारी ७ जुलै रोजी संपूर्ण दिवसभर पाणी साचले होते. दाभोळे वाटूळ रोडची गटारे व्यवस्थित न केल्याने व मोर्यांची कामे योग्य प्रकारे न केल्याने भाई जोशी यांना हा फटका बसला.भांबेड बाजारपेठ येथील शंकर गांधी यांचे दूकानात गटाराचे पाणी व चिखल जावून नुकसान झाले.याला जबाबदार कोण? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल रेडीज यांनी उपस्थित केला आहे. याखेरीज मुंबई गोवा महामार्गावर देवधे येथे महामार्गाची साईडपट्टी खचली आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

काजळी नदीला आलेल्या पुराने मठ येथील दत्त मंदिर रविवारी दिवसभर पाण्याखाली गेले होते . रात्री उशिरा ते पाणी उतरले आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने उघडीप केल्याने

तालुक्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पुराचे पाणी ओसरल्याने पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली आहे.