खेड(प्रतिनिधी) बोरज येथील ज्ञानदीप औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयास २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळाकडून स्क्रूटिनी सेंटर / फॅसिलेशन सेंटरची मान्यता मिळाली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र पदवी प्रथम वर्ष व डायरेक्ट द्वितीय वर्षासाठीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा महाविद्यालयात उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे खेड, दापोली, मंडणगड, महाड, चिपळूण, गुहागरमधील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
याबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकश गुजराथी यांच्यासह सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालय येत्या काळात अनेक सुविधा विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध असल्याचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रुपल पाटणे व गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनिल शिवदे यांनी सांगितले,











