नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड – पेठदेवच्या अध्यक्षपदी भालचंद्र लाड तर चिटणीस पदी ऋषिकेश बेर्डे यांची निवड

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील १९८१ साली स्थापन झालेल्या नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड – पेठदेव च्याअध्यक्षपदी भालचंद्र लाड तर चिटणीस पदी ऋषिकेश बेर्डे यांची निवड करण्यात आली आहे.
नवयुग उत्कर्ष युवक मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भालचंद्र तुकाराम लाड यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी व ऋषिकेश चंद्रकांत बेर्डे यांची चिटणीस पदी निवड करण्यात आली.

 

 

तर उपाध्यक्षपदी प्रमोद गांगण, सहचिटणीस अनिस वाघू, खजिनदार प्रकाश जोशी, कार्यकारणी सदस्य पदी अमोल रेडिज, रवींद्र लाखण, राजेंद्र गांधी, महेश गांगण, प्रमोद धनावडे, संकेत रेडिज, अमृत रसाळ, कैलास गुरव, स्वीकृत सदस्य म्हणून सौरभ सुनील कानडे यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी विनोद शिवराम तावडे, श्रीकांत ठाकूरदेसाई, शरद लाखण, श्रीकृष्ण हेगिष्टे, गणेश इंदुलकर, विजय गांगण, विलास चव्हाण, मधुकर अधटराव यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे सर्व गणेशभक्त, सभासद, हितचिंतक यांच्याद्वारे अभिनंदन करण्यात आले.