खेड(प्रतिनिधी) भरणे – काळकाई नगर येथील रहिवासी अर्चना गजेंद्र जोग यांनी राष्ट्रीय स्तरावरील गीता ज्ञान यज्ञ परीक्षेत अव्वलस्थान पटकावले.
कर्नाटक येथील श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणामाय शारदा पीठम शृंगेरी येथे जगद्गुरु शंकराचार्य विदू शेखर भारती यांच्या उपस्थितीत स्पर्धा झाली. संपूर्ण गीता कंठस्थीकरणातअर्चना जोग या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.
त्यांना २१हजार रूपये, भगवान श्रीकृष्णाची मठाधीश्वरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, प्रतिमा देवून गौरवण्यात आले. त्यांना सुवर्णपदकही प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.











