उद्योजक विजय गांगण यांचा कोकणस्थ वैश्य समाजाच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मान 

 

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र आणि उमा सर्जिकल या कंपनीचे सर्वेसर्वा उद्योजक विजय गांगण यांचा कोकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य समाजाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे पार पडला.

कोकणस्थ वैश्य समाजाच्या १३७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र असले असलेले विजय गांगण यांनी मुंबईत उमा सर्जिकल कंपनीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात व्यवसायात पदार्पण केले होते. या उद्योगाच्या माध्यमातून भारतातच नव्हे तर देश विदेशात देखील आपला नावलौकिक राखला आहे. उद्योग व्यवसायाबरोबरच ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. भांबेड गावाच्या सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. सहकार्य असते. भांबेड पंचकोशी शिक्षण संस्थेचे ते सल्लागार आहेत. त्यामुळे संस्थेलाही त्यांची नेहमी मोठी मदत असते.

विजय गांगण यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ॲड.सदानंद गांगण, भालचंद्र लाड ,प्रमोद गांगण, विनय गांगण, सुनील कानडे व अन्य सर्व संस्था पदाधिकारी, हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.