चिपळूण कामथे येथील गुरुवारी सकाळची घटना
वेंगुर्ले l दाजी नाईक :मुंबई गोवा महामार्गवर चिपळूण कामथे येथे भीषण अपघात झाला आहे. रस्त्यालगत 22 चाकी कंटेनर उभा होता याचवेळी मुंबईहून वेंगुर्ला कडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की टेंपोतील दोघे जणांचा जागीच मृत्यू झाला. कु. ऋत्विक शिरोडकर वय २४ आणि,रामकृष्ण शेणई वय २८ दोघे राहणार वेंगुर्ले असे त्या दोघांची नावे आहेत.ही दीर्घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले मध्ये शोककळा पसरली आहे.











