राजापूर । ”प्रतिनिधी :उद्या शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 12.30 श्रावणातील एकादशीनिमित्त राजापूर तालुक्यातील वारकरी मंडळी श्री भक्त पुंडलिक मंदिर ते विठ्ठल मंदिर बाजारपेठ राजापूर अशी वारी काढणार आहेत. या वारीचे हे पहिलंच वर्ष आहे.
गेली कित्येक वर्ष कार्तिकी एकादशीला ही सर्व राजापूर तालुका व शहर परिसरातील वारकरी मंडळी पंढरपूर वारीला जातात त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरील पुंडलिक मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत पंढरपूर येथे वारी काढली जाते. पण आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे या सर्व मंडळींना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही. म्हणून कोकणातील राजापूर बाजारपेठे मधील प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी श्रावणातील एकादशीला वारी काढण्याचा संकल्प या वारकरी मंडळींनी केला आहे.
उद्या सकाळी 9 वाजता ही सर्व मंडळी पुंडलिक मंदिर येथे एकत्र जमून त्या ठिकाणी असणाऱ्या नदीमध्ये स्नान करून व श्री भक्त पुंडलिकाची पूजा करून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल मंदिर येथे दिंडीने जाणार आहेत.त्या ठिकाणी भजन व हरिनामाचा पाठ होऊन दिंडीची सांगता होणार आहे असे वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्री. राजापकर, श्री. चोरगे यांच्या कडून कळविण्यात आले आहे.
तरी राजापूर शहरातील भक्त मंडळींनी या पंढरपूर वारीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करणाय आले आहे











