फ्रिज मानकरी सानिका मेस्त्री ; उपविजेत्या शितल सारंग यांना वॉशिंग मशीन

अन्य विजेत्यांवरही बक्षीसांचा वर्षाव

भाजपा नेते निलेश राणे पुरस्कृत भव्यदिव्य नारळ लढविणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढील वर्षी यापेक्षा मोठी स्पर्धा : निलेश राणे

अमित खोत | मालवण : भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत महिलां सहभातील नारळ लढवण्याची स्पर्धा उत्स्फूर्त अश्या प्रतिसादात मालवण बंदर जेटी येथे संपन्न झाली. उदंड असा प्रतिसाद स्पर्धेस लाभला. स्पर्धेत सानिका मेस्त्री या विजेत्या ठरल्या तर शितल सारंग या उपविजेत्या राहिल्या.

तृतीय व चतुर्थ व क्रमांक पल्लवी फर्नांडिस, दिक्षा गांवकर यांनी प्राप्त केले. स्पर्धेतील विजेत्याना रिफ्रिजरेटर, उपविजेत्यांना वॉशिंग मशीन, तृतीय, चतुर्थी फॅन यांसह लकी कुपन यांना सोन्याची नथ आणि अन्य बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात आली.

स्पर्धेचे उदघाटन निलेश राणे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेस लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निलेश राणे यांनी पुढील वर्षी यापेक्षा मोठया स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्याचे जाहीर केले. तर या स्पर्धेचे यश हे सर्व सहकारी पदाधिकारी भाजप कार्यकर्ते यांचे असल्याचे सांगीतले.

यावेळी भाजपा महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शहर अध्यक्षा अन्वेशा आचरेकर, अध्यक्षा राणी पराडकर, वैष्णवी मोंडकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, पूजा सरकारे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, तारका चव्हाण, तुलसी चव्हाण, महिमा मयेकर, अमिता निव्हेकर, दिव्या कोचरेकर यांसह जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत , तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, पंकज सादये, आप्पा लुडबे, संचालक आबा हडकर, सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर यांसह पर्यटन व्यावसायिक, भाजपा शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, केदार झाड, देवानंद लोकेगावकर, राजु बिडये, भाई मांजरेकर, बंड्या पराडकर, राकेश सावंत, मंदार लुडबे, अभी लाड, ललित चव्हाण, निषय पालेकर भाजपा, शिवसेना पदाधिकारीही उपस्थितीत होते.