आंब्रड येथे वृक्षाला राखी बांधून वृक्षाचे संवर्धन व संरक्षण करण्याबाबत जनजागृती

 

श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड प्रशालेचा उपक्रम

स्वप्निल कदम | कुडाळ : तालुक्यातील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड प्रशालेने रक्षाबंधनाच्या औचित्य साधून आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून वृक्षाचे संवर्धन व संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना एक महत्वाचा संदेश दिला. वृक्ष ही आपल्याला जीवन वायू देत असतात त्यामुळे त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी जशी भावाची बहिणीसाठी असते.

 

 

तशीच पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी आपली असते. असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. दरम्यान वृक्ष संवर्धन बाबत गावात प्रशालेच्या वतीने जनजागृती फेरी काढून झाडांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र राठोड संस्था सहसचिव पांडुरंग दळवी प्रशालेतील शिक्षक श्री खांबल, श्री पवार, सौ कसालकर, मॅडम सौ गवस मॅडम तसेच यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.