सूत्रे हातात घेताच नूतन पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची धडक कारवाई

 

गावठी दारू, मटका व अन्य अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

संतोष कोत्रे | लांजा -: लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी शहर व तालुक्यात चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गावठी दारू, मटका अशा अवैध धंदेवाल्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. तर या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे
मुंबई गोवा महामार्गावर बसलेल्या लांजा शहरात आणि तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेषतः मटका, गावठी हातभट्टीची दारू यासह अन्य जुगार अशा अनेक व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले होते.राजरोसपणे हे अवैध धंदे सुरू होते. या मटका, जुगार या तालुक्यासह शहरात चालणाऱ्या या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे.

 

 

 

या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निळकंठ बगळे यांनी शहर व तालुक्यात अशा अवैध धंद्यांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे .अवैध आणि विनापरवाना चालणारे गावठी हातभट्टीची दारू विक्री,मोठ्या प्रमाणात चालणारा हा मटका जुगार यासारख्या अवैध धंद्यांवर त्यांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे .त्यांच्या या धडक कारवाईमुळे अशा अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या या कारवाईचे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे.
अशाच प्रकारची कारवाई ही पोलिसांकडून अपेक्षित होती. निळकंठ बगळे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जोरदार मोहीम सुरू झाल्याने या कारवाईचे स्वागत केले जात आहे . शहरासह तालुक्यातील अशा अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे अशी मागणी देखील केली जात आहे.