खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील बिजघर मावळतवाडी येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या माजी विद्यार्थी राजेश भोसले व अशोक भोसले यांनी वडील कै. नारायण भोसले यांच्या स्मरणार्थ बिजघर क्र. १ प्राथमिक शाळेस संगणक संच व गुगल टीव्ही सुपूर्द केला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, सुनील भोसले, सामाजिक कार्यकर्ते कमलेश भोसले, रामचंद्र ‘गायकवाड, कुंदा पार्टे, भगवान भोसले, निलेश विचारे, माजी विद्यार्थिनी मानसी भोसले, भाग्यश्री पराडकर, भिविजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर आदी उपस्थित होते.









