पुनस सरोदेवाडीतून एकाला घेतले ताब्यात, गुन्हा दाखल
लांजा( प्रतिनिधी) विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी कारवाई करताना तालुक्यातील पुनस सरोदेवाडी येथील एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पुनस येथे एक जण बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास देवधे पावस रोडवर पुनस येथील उजवे बाजूस असलेल्या माळावर एका आंब्याच्या झाडाखाली गावठी हातभट्टीच्या दारू विक्री करणाऱ्या हर्षद कृष्णा वाघाटे (वय ३३ राहणार पुनस सरोदेवाडी) याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी पाच लिटरची गावठी हातभट्टीची ५३० रूपयांची दारू जप्त केली.
. विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी हर्षद वाघाटे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावलेकर हे तपास करत आहेत.










