पहिल्या व दुसऱ्याही टप्प्यात प्रथम क्रमांक लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव यांनाच. तीन लाख रुपयांचे पारितोषक मिळविले .
मंडणगड l प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम अंतर्गत आयोजीत दूसरा टप्यातील तालुका स्तरीय स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कुलने प्रथम क्रमांक मिळवीला व तीन लाखांचे पारितोषिक मिळवीले.
या स्पर्धेत तालुक्यातून अनेक दिग्गज शाळा सहभागी झाल्या होत्या. प्रथम केंद्र स्तरावर मूल्यांकन झाले त्यामध्ये कुंबळे केंद्रात प्रशालेने प्रथम क्रमांक मिळवीला. त्यानंतर तालुका स्तरीय कमिटीने मूल्यांकन केले. यामध्येही प्रशालेने प्रथम क्रमांकांचे पारितोषक मिळविले. तसेच शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीही निवड झाली. आणि 04 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा स्तरीय कमिटी कडून मूल्यांकन करण्यात आले आहे. मूल्यांकन करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा सावंत, उप शिक्षणाधिकारी रत्नागिरी श्री. नरेंद्र गावंड श्रीम.सरोज आखाडे, विस्तार अधिकारी, राहुल बर्वे जे. अधिव्याख्याता डायट, गोपाळ चौधरी उप शिक्षणाधिकारी.जि. प. रत्नागिरी, केंद्र प्रमुख विष्णू पवार हे उपस्थित होते. शाळेला मिळालेल्या यशासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आमदार भाईसाहेब जगताप व सर्व संस्था पदाधिकारी, सदस्य, शालेय समिती यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शालेय सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच पंचक्रोशीतील सर्व पालकांचे, विद्यार्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हुलगे, कला शिक्षक जितेंद्र कलमकर, इंग्रजी शिक्षिका सौ. मानसी पालांडे, गणित शिक्षक विक्रम शेले, संगणक तज्ञ शिक्षिका सौ. विनया नाटेकर श्री. प्रमोद जाधव, विज्ञान शिक्षिका श्रीम.पवार, क्रीडा शिक्षक गौतम माने, लिपिक श्रीकृष्ण दळवी कार्यालयीन सेवक महेंद्र गुडेकर, संजय गौड तसेच प्रशालेचे सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
हायस्कूलच्या या यशानंतर तालुक्यातील सर्वच स्तरातून हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हुलगे व सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.











