खेड(प्रतिनिधी)गणेशोत्सवाच्या सांगते बरोबर मोठ्या संख्ये ने मुंबई कडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने खेड मधून सहा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
१३,१४,१५ सप्टेंबर ला सलग तीन दिवस या गाड्या खेड स्थानकातून रवाना होतील.या गाड्या पनवेल पर्यंत धावतील.सकाळीं सहा आणि दुपारी सव्वा तीन वाजता खेड स्थानकातून या अनारक्षित गाड्या रवाना होतील.या गाड्यांना २० बोगी असतील.या गाड्यांना खेड ते रोहा पर्यंत सर्व स्थानकाला थांबे असतील पुढे या गाड्या रोहा आणि पनवेल ला थांबतील.१५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजता सुटणारी ट्रेन मात्र सी एस टी एम पर्यंत धावेल या गाडीला पनवेल,दादर आणि ठाणे स्थानकात हि थांबा असेल.या गाड्यांच्या घोषणेमुळे कोकण रेल्वे च्या खेड स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यात यश येणार आहे. असा विश्वास रेल्वे प्रशासनाला वाटत आहे











