मध्यस्थीच्या मार्गाने खटले सोडविणे बाबत खेड मध्ये शिबीर

 

 

खेड(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुबई यांचे निर्देशानुसार विधी सेवा समिती, खेड व पोलिस ठाणे, खेड यांच्या संयुक्त विदयमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम द.ग.तटकरे सभागृह, खेड येथे पार पडला

खेड तालुक्यातील पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्यासाठी आयोजित केलेल्या मध्यस्थीचे महत्व या कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुधीर देशपांडे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी त्यांनी मध्यस्थीमुळे पक्षकारांचे होणारे फायदे त्यामुळे होणारी पैशाची आणि वेळेची बचत मध्यस्थीची प्रक्रिया नेमकी कशी पार पाडते. मध्यस्थीच्या मार्गाने खटले सोडविल्यास खटल्यामध्ये अंतिम निकाल प्राप्त होतो. त्यामुळे पक्षकारांचे पुढचे वर्षानुवर्षे वाचतात. अशी माहिती डॉ. सुधीर देशपांडे यांनी याप्रसंगी दिली.

तसेच सर्व पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांनी आपआपल्या गावांमध्ये मध्यस्थी च्या माध्यमातून खटले कसे सोडविले जातात त्याचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन केले.

याप्रसंगी श्री. पी. एस.चांदगुडे जिल्हा न्यायाधीश – २ खेड, श्री. शिवाजी जगताप, उप विभागीय अधिकारी – खेड, श्री. सुधीर सोनवणे, तहसिलदार खेड, श्री. नितीन भोयर, पोलीस निरीक्षक – खेड, तसेच सर्व पोलीस पाटील व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी श्रीमती कांचन साळवी, श्री संदिप जोशी, श्री. सहदेव अंधारे यांनी परिश्रम घेतले.