पावस येथे ईद -ए- मिलाद साजरी भव्य मिरवणूक उत्साहात

 

गावखडी /वार्ताहर :इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ईद-ए- मिलाद जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्ला पावस तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून मुस्लिम समाजामध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहेत. त्यानिमित्त सजावट , विद्युत रोषणाई ,मिरवणूक, वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ईद – ए- मिलाद निमित्त जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्ला पावस च्या वतीने भव्य मिरवणूक हजरत शेख महंमद पीर दर्गा ते काझी मोहल्ला, दखनी मोहल्ल्यात फिरून जामा मस्जिद दखनी मोहल्ला मध्ये ईद-ए-मिलाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आज या दिवसाला मुस्लिम समाजात फार मोठे महत्त्व आहे .हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष वसीम शौकत म्हालदार , रिजवान रोशनखान फडनाईक, दाऊद म्हामूद मुजावर, फैजल दाऊद झारी , ईकबाल अ. फडनाईक, आदींनी परिश्रम घेतले तसेच सर्व शांततामय वातावरणात पार पडण्यास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश चव्हाण, अवधूत सुर्वे , हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश किर आदि पोलीस अधिकारी उपस्थित होते.