उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे जिल्ह्यात विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर 

 

आंबोली व गेळे गावात १८ रोजी शुभारंभ  

जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी सिंधुदुर्ग बाळु देसाई यांची माहिती 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी आंबोली व गेळे गावातुन विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात भाजपा वैद्यकीय आघाडी शिबीर समन्वयकाची भुमिका बजावणार आहे. यासाठी डाॅ.रामचंद्र चव्हाण जिल्हा संयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी हे काम पाहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय मदत कक्ष ,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ – नाशिक , निरामय फाऊंडेशन सार्वजनिक आरोग्य विभाग , यांच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ” विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर ” ३० ऑक्टोबरपर्यंत सर्व तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ १७ रोजी आंबोली व गेळे येथे होणार आहे.