पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत स्वच्छता मोहीम

 

वैभववाडी भाजपाच्या वतीने आयोजन

वैभववाडी | प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत भाजपाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दत्त मंदिर परिसर व दुर्गामाता नजीकच्या चौकात सफाई करण्यात आली. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर झाडूने स्वच्छ केला.

 

 

 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, सज्जनकाका रावराणे, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, राजेंद्र राणे, विवेक रावराणे, देवानंद पालांडे, अतुल सरवटे, रितेश सुतार, स्नेहलता चोरगे, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, प्रकाश पाटील, रमेश शेळके, आशिष रावराणे, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, शिवाजी राणे, राजन तांबे, आनंद नेवरेकर, संतोष पवार, अंकित सावंत, गजानन पाटील, श्री. मोरे, गणेश मारुती मोहिते, प्रकाश सावंत, श्रेयस नेवरेकर, विकास गजोबार, अमित कदम, संतोष यादव, सुगम यादव व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.