बांदा | प्रतिनिधी : रोणापाल येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे गुरुवार ३ ते शुक्रवार ११ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी आरती व महाप्रसाद होईल.
गुरुवार ३ व शुक्रवार ४ रोजी संध्या. ७ वा. स्थानिक भजने, शनिवार ५ रोजी दयासागर छात्रालय रोणापाल व स्थानिक मुलांचे कार्यक्रम होतील. रविवार ६ रोजी विघ्नहर्ता दशावतार नाट्यमंडळ निगुडे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, सोमवार ७ रोजी संध्या. ७ वा. स्वरसंध्या मैफिल, मंगळवार ८ रोजी संध्या. ७ वा. श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
बुधवार ९ रोजी संध्या. ७ वा. दांडिया नृत्य, गुरुवार १० रोजी संध्या. ७ वा. जादूगर अवधूत कलामंच (चिपळूण) यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. शुक्रवार ११ रोजी खास महिलांकरिता खेळ पैठणीचा (होम मिनिस्टर) कार्यक्रम होईल. शुक्रवारी १२ रोजी दुपारी २ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीदेवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल तर्फे करण्यात आले आहे.
———












