आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळा दक्षिण विभाग 2 तायक्वांदो स्पर्धा कोकमठाण, कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र. मुले आणि मुली दिनांक 19 ते 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित,करण्यात आली होती.या स्पर्धत एकूण 2800 खेळाडूनी सहभाग नोंदवला होता. गौरी इयत्ता 9 वी SVM स्कुळ मध्ये शिकत आहे.व सुरभी राजेद्र पाटील ही इयत्ता 6 वी मध्ये पोदार स्कूळ मध्ये शिकत आहे. गौरी व सुरभी ला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच , महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे .
उत्तरांखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी आज रवाणा होणार आहे. ही स्पर्धा दिनांक 09 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2024 रोजी मदर इंडिया पब्लिक स्कूल उत्तरांखंड येथे होणार आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. मोनिका जैसवाल, सौ.राधा करमरकर, सौ. सपना साप्ते, उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सुरभी व गौरीला शुभेच्छा दिल्या, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी,
तसेच गणराज क्लब चे पदाधिकारी अभिजित विलणकर, नुतन किर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिप्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.












