रत्नागिरी । प्रतिनिधी
मिऱ्या नागपूर हायवेवर रत्नागिरी शहराजवळ भीषण अपघात झाला आहे
दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहेत
डंपरची ठोकर बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला
मिऱ्या नागपूर हायवेचे काम सध्या येथे सुरू असून डंपर सारख्या मोठ्या वाहनाची येथे वर्दळ आहे
मात्र त्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणाच सध्या अस्तित्वात नाही अशा पद्धतीने वाहने चालवली जात आहेत
त्याचाच हे दोघे बळी असल्याचे म्हटले जात आहे












