आचरा येथे झालेल्या गोळीबारात एक जखमी ; जमिनीच्या वादातून प्रकार

 

आचरा | प्रतिनिधी :

मालवण तालुक्यातील आचरा तिठा एका संशयित आरोपीने हवेत गोळीबार केला एक व्यक्ती जखमी झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आचरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुवारी सायंकाळची ही घटना असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आजरा येथून देवगड कडे जाणाऱ्या मार्गावर हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येते. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे वृत्त आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवगड कडे जाणाऱ्या रस्त्यावर जमीनीच्या वादातून हावेत फायरिंग करण्यात आली आहे. सदर वेळी गैरव पेंडणेकर याच्यावर हल्ला झाला.

असल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच संशयित आरोपी याला देखील ताब्यात घेतले आहे.