मंडणगड/प्रतिनिधी : तायक्वाॅंडो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांडो असोसिएशन ऑफ गोवा यांच्या मान्यतेने तायक्वांडो अॕकॕडमी आॕफ वास्को यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या ओपन नॅशनल तायक्वाॕंडो चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता मंडणगड तालुका तायक्वाॅंडो अॕकॅडमीचा सेकंड डॅन ब्लॅक बेल्ट खेळाडू प्रशिक आदेश मर्चंडे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा पेडेम स्पोर्ट्स काॅम्पलेक्स इनडोअर स्टेडियम करसवाडा म्हापसा गोवा येथे दि. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत प्रशिक आदेश मर्चंडे हा सबज्युनियर गटात खेळणार असून सध्या तो तायक्वाॅंडो खेळाचे प्रशिक्षण तायक्वाॅंडो सेंटर क्लब मंडणगड येथे घेत असून शालेय शिक्षण तो जिल्हा परिषद शाळा गांधीचौक मंडणगड इयत्ता चौथी मध्ये घेत आहे. स्पर्धेत त्यांचे प्रशिक्षक म्हणून अॕड. तेज कुमार लोखंडे असणार आहेत. प्रशिक यांनी यापूर्वी विविध स्तरावर सुवर्ण, रौप्य , कांस्य अशी पदके पटकावली आहेत मात्र राष्ट्रीय स्तरावर तो प्रथमच खेळणार आहे. त्याच्या या खेळातील यशाचे अभिनंदन करून त्याच्या या स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्हा तायक्वाॅंडो असोसिएशनचे अध्यक्ष व राज्य तायक्वाॅंडो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे,सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, मंडणगड तालुका तायक्वाॅंडो अॕकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, क्लब अध्यक्ष आदेश मर्चंडे महिला मुख्य प्रशिक्षिका काजल लोखंडे तसेच सर्व संचालक व खेळाडू यांनी शुभेच्छा दिल्या.












