रत्नागिरी : वाढते मधुमेही रुग्ण आणि वेदनाशामक औषधे यांचा अतिरेकी वापर तसेच स्टीरॉईड्स च्या गैरवापरामुळे किडनी फेल्युअर चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा रुग्णांमध्ये डायलिसिस करणे किंवा किडनी प्रत्यारोपण करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. बहुतांश रुग्णांना किडनी प्रत्यारोपण करणे शक्य होत नाही व परवडणारे नसते. त्यामुळे हिमोडायलिसिस करणे हाच पर्याय राहतो. ज्या गरीब रूग्णांना आठवड्यातून दोन तीन वेळा डायलिसिस करणे आवश्यक असते ते अर्थिक अडचणी मुळे कसेबसे आठवड्यातून एकदाच डायलिसिस उपचार करतात. ह्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरीतील सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरीटेबल ट्रस्ट ने ही सुविधा लायन्स च्या माध्यमातुन देण्याचे नक्की केले. अत्यंत किफायशीर दरात ही सुविधा आम्ही देणार आहोत.
फेब्रुवारी २०२४ मधे डायलेसिस सेंटर ची सुरूवात झाली असून आतापर्यंत अत्यल्प दरात डायलेसिस सुविधा देण्यात येत होती. थोड्याच कालावधीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मान्यता मिळाल्यावर ही सुविधा पूर्ण पणे मोफत दिली जाणार आहे. परंतु वाढीव रूग्ण संख्या आणि डायलेसिस ची गरज बघता लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट ने डायलेसिस ची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला असून येत्या डिसेंबर २०२४ पासून याचा लाभ रत्नागिरीमधील रूग्ण घेऊ शकतात. एका रूग्णाची आठवड्याला दोन डायलिसीस ही मोफत करण्यात येणार असून पुढील डायलेसिस साठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे.
तरी रत्नागिरीमधील डायलेसिस ची आवश्यकता असणार्या रुग्णांनी लायन्स डायलेसिस सेंटर मधील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन डॉ.संतोष बेडेकर , कार्याध्यक्ष लायन डॉ. शैलेंद्र भोळे, सचिव लायन पराग पानवलकर , सहसचिव आणि डायलेसिस सेंटर प्रकल्प चेअरमन लायन ओंकार फडके यांनी केले आहे.












