वातानुकुलीत बस,पण सेवेचा बट्ट्या बोळ

चिपळूण दोपली EV बससेवेवर प्रवासी नाराज

गौरव पोंक्षे माखजन: 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चिपळूण दापोली मार्गांवर इव्ही बस सुरु केली खरी पण प्रवाशांच्या नजरेत झिरो रेटिंग ठरत आहे.
दापोली आगारात दाखल झालेल्या इव्ही बसेस दापोली चिपळूण,व दापोली खेड मार्गांवर फिरवल्या जात आहेत.या बसेस मध्ये चक्क वातानुकुलीत बसेस असून देखील ac नादुरुस्त अथवा सतत बंद केल्याने प्रवाशांना बंद गाडीत गरम्याचा त्रास होत आहे.गाडीतील एसी,युएसबी व अन्य सोयीसुविधांकडे प्रवाशानी लक्ष वेधले असता,गाडीची बॅटरी उतरत आली आहे.गाडी डेपोत पोहचेल की नाही शंका आहे असे सांगण्यात येत आहे.आवाजवी पैसे आकारून दापोली आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे.
संबंधित गाड्यां च्या काचा देखील बंद असल्याने,एसी नसेल तर त्या काचा उघडल्या जात नसल्याने,प्रवासी गुदमरत आहेत.एसी बस चा प्रीमियम फेअर आकारून प्रवाशांना प्रीमियम सेवा देण्याऐवजी प्रवाशांची परवड होत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महामंडळाला, खाजगी बसेस च्या स्पर्धेत उतरणे केवळ अशक्यप्रत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.किंबहुना संबंधित आगार ही सेवा बजावण्यात कुचकामी पडत असल्याचे चित्र आहे.
संबंधित गाडीची बॅटरी उतरली तर,बस त्याचं ठिकाणी थांबेल,दुसरी गाडी बोलावून पुढील प्रवास पूर्ण करावा लागेल असे वाहकाकडून सांगितले जाते.प्रवाशांचा वेळ,पैसा याची महामंडळाला कदर नाही का असा सवाल संतप्त प्रवासी करीत आहेत.सदर बंदिस्त असलेल्या बस मध्ये अवाजवी प्रवासी भरले जात आहेत.अतिरिक्त तिकीट काढून प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयीच पदरात पडत आहेत.
प्रवाशांची होणारी ही परवड तात्काळ थांबवा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.