नाधावडेकर घाडी – गुरव चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

अथर्व इलेव्हन इस्वलकरवाडी प्रथम तर प्रसित इलेव्हन द्वितीय

वैभववाडी | प्रतिनिधी : नाधवडेकर घाडी गुरव चषक २०२३ आयोजित क्रिक्रेट स्पर्धेत अर्थव इलेव्हन इस्वलकरवाडी संघाने प्रथम तर प्रसित इलेव्हन यांनी व्दितिय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मुंबई भाईदर येथे भरवण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १५०००/- रोख व आकर्षक चषक ( उद्योजक श्री.संदेश कवीतले यांजकडुन ), तर व्दितिय क्रमांकास ११०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक ( श्री.सुधिर सुर्वे यांजकडुन ) देण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर नाधवडे गावचे एक आदर्श नागरीक श्री. वसंत पावस्कर, घाडी गुरव चषक चे मार्गदर्शक श्री.महादेव घाडी, नाधवडे ग्राम विकास मंडळाचे खजिनदार श्री.रविद्र ( बाबा ) खांडेकर, औदुबर सेवा ट्रस्ट चे सचिव श्री.दिपक पावस्कर, खजिनदार श्री.रुपेश कुडतरकर, बोरीवली विभाग क्षञिय घाडी गावकर सेवा समाज मुंबई अध्यक्ष श्री.प्रफुल घाडी, श्री दिपक भा.कुडतरकर, श्री.प्रविण गुरव, श्री.चिंतामणी घाडी, श्री.योगेश घाडी, श्री.योगेश शेट्ये, श्री.श्रीकृष्णा नारकर, कु.ओम नारकर, श्री.संतोष सावंत, श्री.विजय इस्वलकर, श्री,प्रदिप कुडतरकर, श्री. संतोष नारकर, श्री.संदिप सु.कुडतरकर, श्री.जयेश शेट्ये, कु.राजेश पाटणकर, श्री. अंकित शेट्ये, श्री.संजय कुडतरकर, श्री.अमित (पप्या ) गुरव, श्री.समिर परब, श्री.संतोष पावस्कर, कु.सुरज पावस्कर, श्री.विजय शेट्ये, श्री.अनंत टक्के, कु.मयुरेश पाटणकर, कु साईल शेट्ये, तर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री.सागर कदम, उद्येाजक श्री संदेशजी कवीतले, उद्योजक श्री.सुधिरजी सुर्वे, श्री,सुहास घाडी, श्री.संतोष टक्के, श्री.काॅलिन डिसोजा, श्री.महेश घाडी यांनी विषेष सहकार्य केले.
या स्पर्धेत सामनावीर म्हणुन कु.यश जाधव ( प्रसित इलेव्हन ), उत्कृष्ठ फलंदाज कु.कुणाल
( प्रसित इलेव्हन ) तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणुन अमेय (अर्थव इलेव्हन ) यांना समानचिन्ह व रोख रक्कम देवुन गौरविण्यात आले.
उपस्थितांचे नाधवडेकर घाडी गुरव मिञ मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.