खेड(प्रतिनिधी)मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ८ वा च्या सुमारास गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणारा ट्रेलर वरील अवजड साहित्य रस्त्यावर कोसळून ट्रेलर कलंडला. त्यामुळे म्हामर्गावरील वाहतूक सुमारे चार तास बाधित झाली
अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर या ट्रेलर ने अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापला होता. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांना घटनास्थळी थांबून वाहतूक नियमन करावे लागले. अखेर क्रेन च्या सहाय्याने ट्रेलर सरळ करून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला.सायंकाळी उशीरा पर्यत अवजड साहित्य बाहेर काढण्याचे काम सुरू होते












