प्रमोद शेलार करणार शेतीविषयक मार्गदर्शन
चिपळूण (वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण यांच्या वतीने रविवार दिनांक १२ रोजी तिरुपती ट्रेनिंग सेंटर भाजी मार्केट दादर पश्चिम येथे दुपारी २.३० ते ५.३० वाजता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि शेती विषयक मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार प्रोडूसर कंपनीचे संचालक प्रमोद शेलार यांची उपस्थिती लाभणार आहे. शेती विषयक आधुनिक उद्योग धंद्यामध्ये उपलब्ध संधी आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये गुंतवणूक फायदेशीर कशी होते अशा अनेक मुद्द्यांवरती ते प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून सचिन बुदर व शरद बोबले यांचे लाभले आहे. हा कार्यक्रम शाखाचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर असणार आहेत. दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाला चिपळूण तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव रणजित वरवटकर आणि खजिनदार अमेय खापरे यांनी केले आहे.











