अकिल नाईक यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड

लांजा (प्रतिनिधी) मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून गेली आठ ते नऊ वर्षे समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या येथील अकिल रफिक नाईक यांची शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे.

मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे संस्थापक असलेले अकील नाईक यांनी गेल्या आठ नऊ वर्षात संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात तसेच महापूर व अन्य संकटाच्या वेळी लोकांना स्वखर्चाने मदतीचा हात दिला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक प्रसंगांत देखील त्यांनी गोरगरीब जनतेला मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कामाची दखल घेऊनच लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्या शिफारसीने अकिल नाईक यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड ४ ऑक्टोबर २०२९ पर्यंत म्हणजे पाच वर्षासाठी करण्यात आली आहे .
विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल अकिल नाईक यांचे लांजासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.