
लांजातील प्रथम प्रसन्न शेट्ये या तरुणाची सामाजिक बांधिलकी
संतोष कोत्रे | लांजा :- लांजा बस स्थानकातील प्रवासी वर्ग आणि दुकानदार यांना होणारा धुळीच्या त्रास लक्षात घेऊन लांजा शहरातील प्रथम प्रसन्न शेट्ये या तरुणाने स्वखर्चाने आज मंगळवारी संपूर्ण बस स्टॅन्ड परिसरात टॅंकरद्वारे पाणी मारून धुळीचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल प्रवासी व व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई गोवा महामार्गावर बसलेल्या लांजा बस स्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून धुळीच्या त्रासाने प्रवासी वर्ग आणि येथील दुकानदार प्रचंड हैराण झाले आहेत. एखादी एसटी गेल्यानंतर किंवा वाऱ्याने प्रचंड धुळीचे लोट उडत असून हे त्रासदायक ठरत आहेत.
धुळीचा त्रास प्रवाशांबरोबरच दुकानदारांना सहन करावा लागत आहे.
लांजा बसस्थानक मुंबई गोवा महामार्गावर असल्याने या ठिकाणी प्रवाशांची नेहमी गर्दी होत असते. मंगळवारी तर प्रचंड गर्दी असते. सध्या बसस्थानकात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.गाड्यांच्या रहदारीने तसेच वार्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोटच्या लोट उडत असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. बसस्थानकातील दुकानात धुळीचे लोट शिरतात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचे आजार होण्याची भीती प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगार प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून प्रवाशांची धुळीच्या त्रासाची गैरसोय दूर करावी
अशी मागणीही केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांची धुळीच्या त्रासाने होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज मंगळवारी प्रथम प्रसन्न शेट्ये या तरुणाने स्वखर्चाने संपूर्ण बस स्थानकात पाणी मारल्याने धुळीचा त्रास कमी झाला
त्याच्या या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.












