गुणदेत शाश्वत शेतीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

 खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा ५.० अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमात गुणदे येथील कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी देखील सक्रिय सहभाग नोंदवत आहे. शाश्वत शेतीसाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून ग्रामस्थांमध्ये जागृती केली.
।सरपंच यशवंत आंब्रे, उपसरपंच रूणाली आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाश्वत शेतीसाठी
काढलेल्या रॅलीदरम्यान शाश्वत शेतीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. ग्रामस्थांनीही या रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.