प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी यांना मातृशोक

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी यांच्या आईं अनुराधा यशवंत साळवी (वय ८८) यांचे मंगळवारी पहाटे दुःखद निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अनुराधा साळवी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच रत्नागिरीतील प्रतिष्ठित नागरिक आणि बांधकाम क्षेत्रातील नामवंत मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयातून त्यांचे शव घरी आणण्यात आले. या ठिकाणी पुढील विधी पूर्ण केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चर्मालय येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रत्नागिरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.