तुळस येथे महारक्तदान शिबिराला प्रतिसाद : ९० जणांचे रक्तदान..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेताळ प्रतिष्ठान चे कार्यकर्ते कै.गुरुदास रवींद्र तिरोडकर यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तर्फे तुळस येथे आयोजित केलेल्या २८ व्या महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ९० जणांनी उस्फुर्त रक्तदान करून गुरुदास यांना श्रद्धांजली अर्पण करीत प्रतिष्ठानला सहकार्य केले.

वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात गेल्या दहा वर्षांमध्ये सलग २७ रक्तदान शिबिरांची यशस्वी वाटचाल करताना यावेळी विविध सहयोगी संस्थां आणि रक्तपेढी सावंतवाडी आणि रक्तपेढी एस.एस.पी.एम. पडवे यांच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे हे शिबिर झाले. उद्घाटन झांटये काजू उद्योग समूहाचे स्वप्निल झांटये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तुळस सरपंच रश्मी परब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, माजी प्राचार्य आनंद बांदेकर, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर व नारायण कोचरेकर, सदस्या स्वाती सावंत, मयुरी बरागडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद तांडेल तसेच नारायण नागवेकर, मारूती दोडशानट्टी, सुजाता पडवळ, किशोर तेंडोलकर, वामन तुळसकर, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक उद्योजक स्वप्निल झांटये यांनी रक्तदान चळवळीविषयी प्रतिष्ठान जे उपक्रम राबवत आहे त्याबद्दल गौरवोद्गार काढले, आपण अशा उपक्रमांशी सतत पाठीशी आहोत असे प्रतिपादन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी गुरुदास यांच्या विषयी भावना व्यक्त करीत रक्तदान सारख्या पवित्र कार्याचा आणि सामाजिक उपक्रमांचा आढाव घेत प्रतिष्ठानचे उपक्रमांचा कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या रक्तदान शिबिरासाठी सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस,आनंदयात्री वांड.मय मंडळ वेंगुर्ला, श्री देवी शारदा प्रतिष्ठान रामघाट वेंगुर्ला, बालगोवर्धन कला क्रीडा मंडळ तुळस, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आदी संस्थांनी सहयोग संस्था म्हणून सहकार्य केले. प्रतिष्ठानच्या मागील रक्तदान शिबिरात ज्या 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते त्यांचे स्केच चित्रकार वामन तुळसकर यांनी रेखाटले होते ते स्केच सदर रक्तदात्याना देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.असा नाविन्य उपक्रम राबवल्याबद्दल वामन तुळसकर यांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश राऊळ, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत,किरण राऊळ,सचिन राऊळ,प्रसाद भणगे,प्रदीप परुळकर, सागर सावंत, प्रतीक परुळकर, प्रज्वल परुळकर,यशवंत राऊळ,जान्हवी सावंत,भक्ती भणगे, हेमलता राऊळ, कुंदा सावंत, विधी नाईक, प्रमोद तंबोसकर, नाना राऊळ, बापू वेंगुर्लेकर, धीरज आळवे, शंकर देसाई, डॉ.जी.पी.धुरी, शिवानी परुळकर, सानिया वराडकर, रामचंद्र परुळकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.