चिपळूण (प्रतिनिधी):– मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणकन्या नागरी पतसंस्थेला रविवार दिनांक १६ रोजी अलिबाग येथे कोकण पतसंस्था भूषण २०२५. दहा लाख ते दोन कोटी या आर्थिक उलाढालीच्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोकण कन्या नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष सुमती जांभेकर सचिव अदिती देशपांडे, संचालक दिप्ती लाड, कल्याणी सैतवडेकर, स्वरा राऊत तसेच कर्मचारी नेहा जाधव, मीरा धामणस्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच पतसंस्थेचे इतर संचालक स्मिता सैतवडेकर, शिवानी पवार, सीमा चाळके, शिल्पा देसाई, संजना पवार, सारिका गुढेकर यांचा ही हा पुरस्कार मिळण्यात मोलाचा वाटा आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पतसंस्थेचे सर्व सभासद व हितचिंतक यांनी पतसंस्थेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पतसंस्थेचे कामकाज महिलाच पहात असल्याने महिला सभासद यांनी पतसंस्थेसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून या पुरस्काराबद्दल सर्व महिला सभासदांनी आनंद व्यक्त केला आहे. गरजू आणि सुशिक्षित महिला बेरोजगार तरुण, तरुणी यांना उद्योगासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. तसेच ठेवींवर देखील योग्य व्याजदर दिला जातो. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी आणखीन वाढली असून पतसंस्थेच्या व्यवहारात अधिक वृद्धी होण्यासाठी आम्ही नक्की जोमाने प्रयत्न करू असे पतसंस्थेच्या सचिव अदिती देशपांडे यांनी सांगितले आहे. त्यांनी संस्थेचे हितचिंतक आणि ठेवीदार यांचेही आभार मानले आहेत.











