बुरंबी येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण उत्साहात

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथे शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० मधील पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण उत्साहात झाले.जिल्ह्यात सर्वत्र हे प्रशिक्षण सुरू आहे.संगमेश्वर तालुक्यात बुरंबी व देवरुख येथे हे प्रशिक्षण सुरू आहे.संगमेश्वर तालुक्यातील हे प्रशिक्षण गट शिक्षणअधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बुरंबी येथील प्रशिक्षणात पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० शिक्षकानी सहभाग नोंदवला.केंद्रप्रमुख दिलीप जाधव हे बुरंबी केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. प्रशिक्षणात प्राथमिक विभागात सुलभक म्हणून संतोष जाधव,संतोष चव्हाण,रवी कदम,आदम सय्यद,संजय बांडागळे,सोमनाथ सराटे, आदी तर ६ वी ते १२ य गटासाठी रघुनाथ फोंडके(देवरुख हायस्कुल),प्रशांत सनगरे(ताम्हाने हायस्कुल),सुरज जाधव (बुरंबी हायस्कुल),सुहास गेल्ये(बुरंबी हायस्कुल),सौ भाग्यदेवी चौगले (कडवई हायस्कुल)आदी काम पाहत आहेत.पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण हे १७ ते २२ फेब्रुवारी असे होत असून,दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण २४ फेब्रुवारी ते १ मार्च असे होणार आहे.
बुरंबी येथील प्रशिक्षण सुलभ होण्यासाठी केंद्रप्रमुख दीपक यादव (तुरळ),भास्कर जंगम(धामणी),दिगंबर सुर्वे(आरवली),दिलीप जाधव (संगमेश्वर),राज्य समन्वयक दत्ताराम गोताड(माखजन) तसेच गट साधन संगमेश्वर चे अमोल कांबळे,कलाश्री मोहिते,गिरीजा होतेकर आदी मेहनत घेत आहेत.
प्रशिक्षणा दरम्यान सुलभक, नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सखोल मार्गदर्शन करत आहेत.गट चर्चा,प्रकल्प आदी विविध कृतीतून प्रशिक्षण सुरू आहे.नवीन शैक्षणिक धोरण हे पुढच्या काळात शाळा स्तरावर राबवण्यासाठी या प्रशिक्षणातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रशिक्षणांती सुलभक व अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली.व ज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ते सन्मान केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब सानप यांनी केले.