डीजीके महाविद्यालयात पोएटीक डिव्हाईसेस कार्यशाळा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात इंग्लिश विभागातर्गत पोएटीक डिव्हाईसेस या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी घेतली.

इंग्रजी विभागाच्या स्टुडन्ट इंग्लिश लिटररी फोरम (सेल्फ) अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर राबविले जातात. या संकल्पनेंतर्गत पोएटिक डिव्हाईसेस ही तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस इंग्रजी विषयाच्या विभाग प्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे पोएटीक डिव्हाईसेस पीपीटीच्या माध्यमातून चित्रे, विविध उदाहरणे व सोप्या भाषेतून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले गेले.

या कार्यशाळेस कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी कला शाखेचे विद्यार्थी, डीजीके महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे ७५ विद्यार्थी कार्यशाळेस उपस्थित होते. समारोप कार्यक्रमात पोएटीक डिव्हायसेसपैकी एकूण ५० डिव्हायसेसचा पुस्तकरूपात संग्रह करून त्याचे प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांच्या हस्ते अनावरण केले. हे पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी कला शाखा विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, कनिष्ठ महाविद्यालयाचे तानाजी वाघमारे, प्रा. गौरी बोटके व प्रा. वीणा कोकजे उपस्थित होते. कार्यशाळेसाठी पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर यांचे सहकार्य लाभले.