नवीन कायद्याने शिक्षेला अधिक बळकटी

गुहागरातील कार्यक्रमात स. सरकारी अभियोक्ता अॅड. सावंत यांचे प्रतिपादन

मोडकाआगर | वार्ताहर : भारत सरकारने फौजदारी तीन प्रमुख कायदे नव्याने अंमलात आणले असून या नवीन कायद्याने शिक्षेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे, अशी माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. संजोग सावंत यांनी दिली.गुहागर पोलीस ठाणे यांच्यावतीने ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात आयोजित कायदेविषयकं प्रशिक्षण कार्यक्राम ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, महिलांसंदर्भात व बालकांसंदर्भातील कायद्यामध्ये सुसूत्रता आणली आहे. कोणत्याही घटनेची पंचनाम्यादरम्यान व्हिडीओग्राफी करुन ते पुराव्यात वापरता येऊ शकते. तसेच मोबाईलवरुन आलेल्या फिर्यादीची दखलही पोलिसांनी घ्यावी, अशी ही नवीन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिला विषयी कायदे, पोक्सो कायदे तसेच इतर कायदे याविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यासह गुहागर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.