सामाजिक बांधिलकीच्या आवाहनाची न.प. प्रशासनाकडून गंभीर दखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील लक्ष्मी नगर येथे दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तीठ्यावर पडलेला भला मोठा खड्डा बुजवून होणारे अपघात टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी संघटनेने केलेली मागणीची त्वरित दखल घेत नगरपालिका बांधकाम विभागाने तो खड्डा सिमेंट काँक्रीटने बुजवला. याबद्दल संघटनेचे पदाधिकारी रवी जाधव यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज राऊळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
सावंतवाडी शहरातील लक्ष्मी नगर येथे मुख्य तिठ्यावर भला मोठा खड्डा पडला होता. त्या ठिकाणी अनेक अपघात होऊन काहीजण गंभीरित्या जखमी झाले होते. सोमवारी सदर खड्ड्यात महिलेची दुचाकी घसरून तिला गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेनंतर शहरात झिरो अपघात मिशन राबविणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम तसेच रूपा मुद्राळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत नगरपरिषदेचे याबाबत लक्ष वेधले होते. त्यानंतर नगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज राऊळ यांनी घटनास्थळी भेट देत सदरचा खड्डा त्वरित बुजविण्याचे काम हाती घेण्याचे आश्वासन सामाजिक बांधिलकी संघटनेसह स्थानिक रहिवाशांना दिले होते.
त्याबाबत त्वरित कार्यवाही करत अगदी चार तासात मंगळवारी दुपारी हा खड्डा सिमेंट काँक्रीटने पूर्णपणे बुजवून टाकला. याबाबत बांधकाम अधिकारी मनोज राहुल यांचे सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आभार मानले. यासाठी पुढाकार घेणाऱ्या रवी जाधव लक्ष्मण कदम रूपा मुद्राळे अमित सावंत यांनीही सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ व ठेकेदार दादा नगनूर यांचेही सामाजिक बांधिलकी संघटनेने विशेष आभार मानले.
सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन लक्ष्मीनगर येथील रस्त्यावर पडलेला मोठ्ठा खड्डा काही तासातच बुजवला चार वर्षाचा प्रश्न चार तासातच मिटला.
सामाजिक बांधिलकीच्या वतीने मनोज राऊळ यांचे मनःपूर्वक आभार सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष श्री सतीश बागवे यांनी मानले आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सतीश बागवे , उपाध्यक्ष श्री शैलेश नाईक ,कार्याध्यक्ष श्री संजय पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, हेलन निबरे ,समीरा खलील व अन्य सहकारी सावंतवाडी शहरांमध्ये स्वतःचा वेळ व पैसा खर्च करू शंभर टक्के समाजसेवा करत आहे. खास करून हॉस्पिटल क्षेत्रामध्ये हे कार्यकर्ते दिवसातून तीन तास सेवा पुरवतात.
एखाद्या वेळी अपघात घडल्यास पेशंट व नातेवाईक यांचे काय हाल होतात हे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम पाहत असतात.
म्हणूनच झिरो टक्के अपघात मुक्त सावंतवाडी शहर बनवण्याचे मिशन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने हाती घेतले आहे आणि त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे जे काम हाती घेतले ते पूर्ण केल्याशिवाय सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते शांत बसत नाही याच गोष्टीचे कौतुक सदर प्रतिष्ठानचे होत आहे.
या सेवाभावी उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे अमित सावंत तसेच विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ व कॉन्ट्रॅक्टर दादा नग्नूर व त्यांचे सहकारी यांचे लाभले.












