खेड (प्रतिनिधी) चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे जिल्हा संमेलन भरणे येथील हॉटेल ब्रिसू येथे २ मार्च रोजी सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय कायस्थ समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पदाधिकारी स्नेहसंमेलनास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या स्नेहसंमेलनास समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संस्थापक अध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केले आहे.










