मालवण मेढा समुद्रकिनारी रात्री घडली घटना
मालवण | प्रतिनिधी : मेढा येथे समुद्र किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या एका ट्रॉलरला रविवारी रात्री आगल्याची घटना घडली. किनाऱ्यावरील वाऱ्याने ही आग आणखी भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले होते. आगीवार नियंत्रण मिळवे पर्यत ट्रॉलर जळून गेला.
यावेळी स्थानिक नागरिक, मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकानी धाव घेत अग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच यां ट्रॉलरच्या बाजूला उभ्या असलेल्या इतर नौका तातडीने बाजूला हलवत सुरक्षित स्थळी ठेवल्या. यावेळी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचरण करण्याट आले मात्र याठिकाणी बंब येण्यासाठी योग्य असा एकमेव मार्ग असलेल्या बंदर जेटी रस्त्याचे काम सुरु असल्याने बंब घटनास्थळी येऊ शकला नाही. यावेळी नगरपरिषद फायरफायटर बाईक घटनास्थळी दाखल होऊन त्याद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. काही वेळाने अग्नीशमन घटनास्थळापासून जवळ असलेल्या रस्त्यापर्यंत आला, मात्र तेथून जळत्या ट्रॉलरपर्यंत बंबाचा पाईप पोहचू शकल्याने बंबाचा उपयोग झाला नाही.पाणी माती टाकून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. यां ट्रॉलरचे मालक मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. नेमके किती नुकसान झाले व अधिक माहिती घेण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरु होते.












