बांदा येथील आरोग्य तपासणी शिबीरात ५३७ रुग्णांची तपासणी

तपासणीसह मोफत औषध पुरवठा

बांदा | प्रतिनिधी :           हिंदू एकता मंच बांदा, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ – गोवा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित मोफत आरोग्य शिबिराला परिसरातील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरात तब्बल ५३७ रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषध पुरवठा करण्यात आला.

या शिबिरात हृदयरोग, उच्चरक्तदाब,ऍलजी व दमा, श्वसन विकार, पक्षाघात, नेत्र विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, वातविकार, मधुमेह, बालरोग, मुळव्याध, पचन, कान – नाक – घसा, स्त्रीरोग, थायरॉईड, गुप्तरोग व अन्य जुनाट विकार यावर उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. शिबीरात सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली. यात डॉ. दीपा शिरोडकर, डॉ. सायली कासार, डॉ. सरिता कापगले, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. अभिषेक तिवारी, डॉ. स्वप्निल औटी, डॉ. शुभम ओगले यांचा समावेश होता.

बांदा व्यापारी संघाच्या विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबीर आयोजन बद्दल समाजसेवक गुरु कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, गुरु कल्याणकर, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, निलेश सावंत, मंगेश दादा पाटील, हेमंत दाभोलकर, संदेश पावसकर, वीरेंद्र आठलेकर, मंदार केसरकर,निलेश कदम, म.गो.सावंत, गुरुनाथ नार्वेकर, ऋग्वेद कल्याणकर, शुभम केसरकर, व्यंकटेश ऊरुमकर, प्रकाश गवस, अमित कुडतरकर, नंदादीप केळुसकर, जान्हवी सावंत, श्वेता वराडकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.  या उपक्रमास माजी जिल्हा आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार वीरेंद्र आठलेकर यांनी मानले.