कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अखेर पूर्वपदावर

खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरील राजापूर रोड ते विलवडेदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर सलग दोन दिवस रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले होते. सोमवारी बिघडलेले वेळापत्रक पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. कोकण मार्गावर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या व गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या नियोजित वेळेत मार्गस्थ झाल्या.