फळबाग, फुलबाग भाजीपाला…
आणि सामुदायिक शेतीचा प्रयोग कोकणातही यशस्वी होतो, तसेच सेंद्रिय शेती व टिबक सिंचन शेतीला
फायदेशीर आहे हे खंडाळा
परिसरातील शेतकऱ्यांनी सिद्ध
करुन दाखवले आहे. त्यामध्ये
श्री सुधाकर गणपत जोशी,
प्रकाश गणपत भाटकर, दिपक
प्रकाश बारगुडे व राजा घाणेकर
यांनी सामुदायिक शेतीचा
यशस्वी प्रयोग करून अक्षरशः
काताळावर फुललेली शेती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संपुर्णपणे सेंद्रीय शेतीचा हा प्रयोग अत्यंत फायदेशीर ठरला आहे. या शेतीत टोमॅटो मिरची, कलींगड, कोबी, काकडी, गवार, पडवळ, कारले, खुप छान फुलले आहेत. भविष्यात शेळी पालन, कुकुट पालन, गोपालन आदी पालन करण्याचा मानस आहे. शेतीच्या बाजूला चांगल्या प्रकारे आंबा कलमे बहरली आहेत. या शेतीला ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव आशुतोष भालेकर, विलासराव कोळेकर, उदय महाकाळ व संजय शितप यांनी नुकतीच भेट दिली. अत्यंत कौतुकास्पद हा सामुदायिक शेतीचा प्रयोग ठरला आहे.












