रेल्वे मध्ये मोबाईलसह २५ हजाराची चोरी !

खेड (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मंगळूर जंक्शनमधून मार्गोवा येथे जाणाऱ्या प्रवासी महिलेच्या पर्समधील २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ५ हजार रुपये रोख व इतर महत्त्वाची कागद‌पत्रे अशी २५ हजार रुपयांची चोरी खेड तालुक्यातील कळंबणी रेल्वेस्थानकादरम्यान अज्ञात चोरट्याने करून पोबारा केला आहे. हि चोरी दल ३ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ : १० वाजताच्या सुमारास झाली

 

या प्रकरणी महिला बिभा शेखर (वय-५७, रा. मार्गोवा – गोवा) यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार खेड पोलिसांनी . २७ मार्च २०२५ रोजी दुपारी १:१३ वाजता अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजि. नं ९१/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.