दापोली तालुका व्यापारी संघटना कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षस्थानी विनोद आवळे

दापोली l प्रतिनिधी:- दापोली तालुका व्यापारी संघटनेची तालुका कार्यकारिणी बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी प्रितिवर्धन मंगल कार्यालय जालगाव येथे झालेल्या बैठकीत जाहीर झाली असून विनोद आवळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

मिलिंद शेठ( जालगाव)यांची सचिव, मयूरेश फाटक( जालगाव) यांची खजिनदार तर किरण पेंडसे(जालगाव)जिल्हा समन्वय समिती तालुकाप्रमुख,कौतुभ जोशी( दापोली) स्थायी उच्चाधिकार समिती , राजन मेहता( कुंभवे )उपाध्यक्ष,मिलिंद बारटक्के( हर्णै )उपाध्यक्ष, युवराज पेठे(दापोली) सहसचिव,संजय शेठ(पालगड) सहसचिव,शैलेश गुजर(दाभोळ) सहसचिव, राजेश बोथरे(दापोली) खोका युनियन अध्यक्ष,अशोक चव्हाण(गावतळे) प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

याशिवाय सदस्य म्हणून नितीन शेरे(बुरोंडी) , नितीन कोठारी (केळशी ), केतन पटेल( वाकवली), भरत निर्मळ (विरसई),अभिजीत पतंगे (हर्णै), दिनेश जैन (दापोली), नजीर अरकटे(दापोली), नजीर पठाण (दापोली) कौतुभ पेठे (फणसु) यांची निवड करण्यात आली आहे.सदर ” कार्यकारिणी ही तीन वर्षासाठी काम पाहणार असून तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना संघटित करणे आणि त्याच्या हितासाठी कार्य करणे हा उद्देश असल्याचे नूतन अध्यक्ष विनोद आवळे म्हणाले.